वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज नागपुरात नागपूर दि.10 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी नागपूर येथे येत आहेत. ते सकाळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या बैठकीस एफ.डी.सी.एम. भवन हिंगणा रोड, अंबाझरी येथे उपस्थित राहतील. श्री. मुनगंटीवार रात्री नागपूर येथे मुक्कामी राहणार असून 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील. 000
Posts
दहावी-बारावीच्या परिक्षार्थ्यांसाठी हेल्पलाईन सेवा
- Get link
- X
- Other Apps
.jpeg)
नागपूर , दि. 11 : उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परिक्षेसंबंधात परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्याक्षिक परीक्षा व परीक्षेसंबंधी इतर माहिती विचारणा करण्यासाठी भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांकरिता नागपूर विभागीय शिक्षण मंडळ यांचे कार्यालयाकडून हेल्पलाईन ची सुविधा उपलबध करुन देण्यात आली आहे. इयत्ता १२वी परीक्षेकरीता विभागस्तरावर 9860330860 व 9881613998, तसेच इयत्ता १० वी परीक्षेकरीता 9834726328 व 9405669762 हे कार्यालयीन हेल्पलाईन क्रमांक आहेत. तर जिल्हास्तरावर शारदा महिला विद्यालय, ओम नगर जि नागपूर 8275039252, यशवंत विद्यालय, सेलू. जि.वर्धा 9766917338, समर्थ विद्यालय, ला...