दहावी-बारावीच्या परिक्षार्थ्यांसाठी हेल्पलाईन सेवा
.jpeg)
नागपूर , दि. 11 : उच्च माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र पुरवणी परिक्षेसंबंधात परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहेत. सदर परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्याक्षिक परीक्षा व परीक्षेसंबंधी इतर माहिती विचारणा करण्यासाठी भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांकरिता नागपूर विभागीय शिक्षण मंडळ यांचे कार्यालयाकडून हेल्पलाईन ची सुविधा उपलबध करुन देण्यात आली आहे. इयत्ता १२वी परीक्षेकरीता विभागस्तरावर 9860330860 व 9881613998, तसेच इयत्ता १० वी परीक्षेकरीता 9834726328 व 9405669762 हे कार्यालयीन हेल्पलाईन क्रमांक आहेत. तर जिल्हास्तरावर शारदा महिला विद्यालय, ओम नगर जि नागपूर 8275039252, यशवंत विद्यालय, सेलू. जि.वर्धा 9766917338, समर्थ विद्यालय, ला...